पतंग ❤️

                             "पतंग "
 कधी आकाशात पतंग उडताना पाहिलंय का?....
निळ्याभोर आकाशात उडणारे ते पतंग नकळत खुप काही सांगुन जाते...
जगाचे भान नसलेले ,आपल्याच धुंदीत बेभान ...
वाऱ्याच्या प्रत्येक लहरी सोबत बोलत .. आपल्याच मर्जीने डोलत असते .
एखाद्याला जगण्याचा इतका आनंद घेतलेला पाहून जगण्याची नवीन उर्मीच येते जणु...
नजरेने टिपलेले हे सुंदर दृश्य खरंच इतके सुंदर असते का ???
...
  आपले सगळे गणित तेव्हा बदलते जेव्हा नजर त्याला बांधलेल्या धाग्यावर पडते...
आणि  या गुंतागुंतीच्या आयुष्यात एक क्षणाचा स्वल्पविराम घेऊन विचार करू वाटतो
गगन बेभानपणे विहार करणारे ते पतंग त्या धाग्याला सोबती समजत असेल की मर्यादा !
तो धागा त्या पतंगाला योग्य दिशा देत असतो की स्वतःच्या मनाप्रमाणे जगण्यापासून आडवत असतो ? किती अपेक्षांचे ओझे घेऊन त्या उंच उंच आकाशात उडत असेल ना ते पतंग मग त्याला तो  शुल्लकसा धागा किती किलो वजन वाटत असावे ...
तो धागा एका खऱ्या सोबती प्रमाणे त्याची येणाऱ्या प्रत्येक ऋतुमानात हवी ती साथ देत असेल की आता पतंगाने ठरवलेल्या मार्गावर जाऊच देत नसेल ?
सगळ्यांचा आनंदाचे कारण बणनारे ते पतंग धाग्याच्या बेड्या अगदी आनंदाने स्वीकारत असेल ना?
सतत कोणीतरी आपल्याला आपल्या मर्यादा दाखवत असल्याची जाणीव  मनामध्ये किती पोकळ निर्माण करत असावी?
शेवटी ज्याचा जसा दृष्टिकोण त्याला तशी उत्तरं मिळतील
पण त्या पतंगालाच ठाऊक ...
 मनाची व्यथा ...❤️

Comments

Post a Comment

Popular Posts