' मी बलात्कारी बोलतोय ! '

मी बलात्कारी बोलतोय ,
होय, बरोबर ऐकलं 
मी बलात्कारी बोलतोय
तुम्हाला काय वाटले घाबरेन मी तुम्हाला 
तुमच्या न्यायव्यवस्थेला !
अरे ! शक्यच नाही 
मला हिम्मत मिळाली तुमच्याकडूनच
 त्या चार लोकांच्या समाजातून 
 जिथे पावलोपावली मुलीला एका वस्तू पेक्षा अधिक कधी मानलेच गेले नाही
तिथे मी फक्त त्या वस्तूचा वापरच तर केला !
अरे ! काय झालं राग येतोय माझा
आला तरी चालेल काय कराल
जास्तीत जास्त जन्मठेप
तिथून‌ पण सुटलेच मी
तुमच्यातली चार लोक करतील मला मदत सत्तेसाठी
आणि खरे सांगायचे तर जे झाले त्यात माझी चूक काही नाहीच
मुलीची जात ती... रात्री सात नंतर बाहेर पडलीच कशी
 भले का असेना सात वर्षांची
म्हणून काय ...
माझ्या नजरेत ती देखील एक स्त्रीच !
तिला कळायला नको कपडे कसे घालावेत
अरे लहान असली म्हणून काय ?
आता विचाराल एवढी हिंमत आली कुठून
माझ्या घरात आई बहिणी नाहीत का?
खरं तर तिथूनच तर शिकलो.. सगळ्या चुका माफ !
किती ही  झाले तरी मी एक "बाप्या माणूस"
किळस येते का माझी?
तुम्ही तेवढेच करू शकता
याच्यापलीकडे तुमच्या हातात तरी काय?
मला बदलण्यासाठी तुम्ही स्वतःला विचारा
चुकतय काय?
आज समाजात मी बिनधास्तपणे वावरतो
भले त्या पोरीचे आयुष्य का संपेना.
संपवायचय मला , माझ्या वृत्तीला ?
ते शक्य नाही..
आज मला संपवाल उद्या तिसरा कोणी जागा होईल
एक बाप मुलीवर , तर एक  नवरा लग्नाच्या नावावर आत्त्याचार करील !
इकडे संघाने तर तिकडे  शांततेत
हो काही बदलणार नाही
संपवाल एकाला तर शंभर अजून तयार होतील
 अरे, मग चुकतं कुठे ?
तो एक काळ होता छत्रपतींचा
जेव्हा खुल्या चौकात शिक्षा होईची
तो एक काळ होता त्या लक्ष्मीचा 
जेव्हा मुलगी  स्वतःची रक्षा करायची
तो काळ पुन्हा येईल का ?
जेव्हा मुलामुलींवर  समान संस्कार होतील
तो एक काळ येईल का?
जेव्हा मुली स्वतःसाठी लढतील
होय ,
आहे मी बलात्कारी 
आहे माझी मानसिकता खराब
पण हे पाप करताना माझ्यात बळ येते कुठून ?
द्यायच्या तेवढ्यात शिव्या द्या मला
 पण
एकदा विचार नक्की करा
तुम्ही चुकताय कुठे ?







Comments

  1. खूप छान , हा विषय असा मांडलेला कधीच पहिलं नाही.
    उत्तम प्रकारे मांडला आहे.
    अंगावर शहारे आले.
    छत्रपती शासन ही काळाची गरज आहे.

    Hats Off to you.

    ReplyDelete
  2. Sooo omnicompetent❣️❣️

    ReplyDelete
  3. Fact ......
    खरच विचार करण्याची गरज आहे

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts