एक गोष्ट ......2020 ! 🔐

 किती काही ठरवले होते वर्षाच्या  सुरुवातीला , 
 पण या "बाळ २०२०" ने त्याचे पाय पाळण्यातच दाखवले . सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियाचे जंगल जळाले तर कुठेतरी ज्वालामुखीचा उद्रेक , एवढेच काय तर 2020 ने आपल्याला तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले.
पण हे बाळ(२०२०) , इतक्यातच थांबले नाही "वैश्विक महामारी "काय असते हे देखील जगाला दाखवले.
आणि मग अखेरीस तो दिवस उगवला,
24 मार्च " मन की बात " मध्ये नरेंद्र मोदीने एकविस दिवसाच्या लॉकडाऊनची घोषणा केली आणि आता कसे होणार ! हा विचार सगळ्यांच्याच मनात रेंगाळू लागला.
इकडे या करोणाचे संकट आहे आणि दुसरीकडे लॉक डाऊन ! 
अशी काहीशी सगळ्यांच्याच मनाची द्विधा मनस्थिती होती.
तरी आठवड्याभराचे सगळे सामान जमवून आपण तयार झालो या आव्हानाशी झुंज द्यायला.
प्रत्येकाने हा लॉकडाऊन सर्वाइव्ह  करायचे आपापले मार्ग शोधले होते.
तिकडे एकीकडे " आज काय नवीन बनवायचे ? " असा प्रश्न होता तिथेच दुसरीकडे " आज कशी भूक भागवायची ? " असा प्रश्‍न पण होता. 
म्हणूनच कदाचित कामगार वर्गाला स्थलांतर  हा एक सोपा उपाय वाटला असावा .
डोक्यावर ओझे आणि कडेला पोर घेऊन पायी चालत निघालेले हे वाटसरू पाहून सगळ्यांचे मन भरून आले पण कदाचित हात मात्र खूप कमी लोकांनीच पुढे केले ही देखील एक सत्य परिस्थिती !
इकडे आपल्याला आपला नवीन रियल हिरो 
"सोनू सूद "   मिळाला .
तर दुसरीकडे आपले लक्ष आपल्या जुन्या रियल हिरो म्हणजेच पुरुषोत्तम  रामाकडे देखिले गेले.
 

  "हम कथा सुनाते राम शक्ल गुणधाम की ये            रामायण है पुण्य कथा श्री राम की "

     
हे गाणे  घराघरांमध्ये गुंजू लागले. त्यानिमित्ताने का असेना "आजी ते नात " सर्वजण एका मताने काहीतरी बघू लागले.
     दिवसभर करायचं काय या प्रश्नासाठी सोशल मीडिया  हा एक रंजक असा उपाय बनला.
      दालगोणा कॉफी ते रसोडे मे कोण था ? हा एक विचित्रच प्रवास होता . युट्युबरस्  वर्सेस टिकटॉकरस् वर
जो तो आपली बाजू मांडत होता .
 किती तरी चॅलेंज आले आणि ब्लॅक अँड व्हाईट फोटो म्हणत‌ .....
अजूनही परिसर महिलांसाठी सुरक्षित आहे का हा प्रश्न पाडून गेले.
जुन्या मालिका पुन्हा भेटीस आल्या तर काही ठिकाणी चालू मालिका कधी सुरू होणार?
 याची आस देऊन गेला.
 खिडकीतून बाहेर डोकावत भरारीची वाट बघत जीव पिंजऱ्यातला पक्षी झाला होता तर  कुठे लुप्त झालेला पक्षी सुटकेचा श्वास घेत होता.
जणू जग हे एक " झू "झाले होते आणि "झू" मधले माणसे बघण्यासाठी प्राणीजण रस्त्यावर  अवतरत होते.
 निसर्गाचा खेळच होता जणू " कधी पूर तर कधी भूकंप"
आणि या सगळ्या विघ्नांवर मात करण्यासाठी आपण वाट बघितली ती गणपती बाप्पाची 
आणि विशेष म्हणजे हाच बाप्पा आपल्याला "सोशल डिस्टंटींग " चे धडे देऊन गेला.
जञा , देऊळे बंद पडली आणि माणसांमधला देव बाहेर आला .
 सणसंभारंभ हा तर आपला कणा , अण् पंढरपूरची वारी हा आपला वसा 
तो  हवालदार पण विटेवर झाला उभा , अण् विठुरायाचा उठवला त्याने ठसा.

बघायला गेले तर एक वायरस तो ,
पण किती काही शिकवून गेला 
धावपळीच्या आयुष्यात स्वतःची काळजी घेणे नक्कीच शिकवले.
ना ना प्रकारचे काढे घरी तयार झाले तर बाहेरून येताच  हात सॅनिटायजरच्या शोधात निघाले.
सगळ्यांनी कितीतरी दिवसातून सोबत शांततेत जेवण केले तर कितीतरी वेळा परिवाराच्या सुरक्षतेसाठी करोणा वॉरीयरस् ने एकटेच जेवण केले.
लग्नसराईचा एक वेगळाच असा थाट होता अर्थातच पैशांचा बाजार न करता संबंधाचा तो सोहळा होता.
तिकडे बॉलिवूडमध्ये एक वेगळेच वारे वाहत होते काही लाडके सितारे आकाशात चमकत होते.

" लोकशाहीचा" प्रत्येय पण याच काळात आला पुछता है भारत म्हणत सर्वत्र तो गुंजला.
खेळ जगताला एक वेगळीच ख्याती होती 
कोणाला कधी वाटलं तरी असेल का ती धोनीची शेवटची मॅच होती !
अण् रिटायरमेंटला पण धोनीला रैनाची साथ होती.
शाळेच्या घंटेची जागा आता व्हॉट्सऍप नोटिफिकेशन ने घेतली होती तर काल मी आजारी होते  याला पर्याय नेटवर्क इशू बनला.
परीक्षेचा सगळा पॅटर्न बदलला , अंतिम वर्षाचा विद्यार्थी यात अडकला.
पुन्हा बाहेर जाऊ वाटले पण आता कानावर अजून एक ओझे वाढले अर्थातच " मॅचींग मास्कचे " !
एकत्र गॅंगने पुन्हा धिंगाणा घालावा असे तर खूप वाटले पण हरकत नाही म्हणत आम्ही " गुगल मीट" गाठले.
कीत्तेकांने   घरी नुसते पडून वजने वाढवली तर काहींनी भीतीने का असेना योगाशी मैत्री जोडली.
बड्डेची या लॉकडाऊन मध्ये वेगळीच परिभाषा होती त्याला #homemade  ची साथ होती.
 कधी टाळ्या तर कधी दिवे लावत विविधतेने नटलेल्या या देशाने एकतेचे धडे गिरवले.
      "   समुद्रमंथन हा लग रहा है ये साल ,
           इतना विष निकल रहा है ,
            तो अमृत भी जरूर निकलेगा "
मान्य आहे खूप वाईट असे धडे  देऊन गेला हा २०२० , 
पण काही चांगले नव्हते का ?
 आणि मग , 
या दीर्घ  वाक्याला स्वल्पविराम देण्याचे काम हे या चांगल्या क्षणांने केले.
थोड्यावेळासाठी का असेना पण आपल्याला वेळ मिळाला की आपल्या आजूबाजूला बघण्यासाठी
 काही जणांनी स्वतःची पुन्हा मैत्री केली तर काहींनी मागे पडलेली मैत्री पुन्हा नव्याने शोधून काढली.
 धूळ खात पडलेला तो फोटोंचा ऍल्बम खाली आला आणि बालपणाचे विस्मरणात गेलेले कितीतरी किस्से सांगून गेला.
 लहान भावाने पण घाबरत का असेना पाककलेशी झुंज दिली
तर काही ठिकाणी लुडो मध्ये दिदिने बाजी मारली.
 मित्राच्या वाढदिवसादिवशी हातात पोस्टर घेऊन फोटो काढले 
तर कुठे पांढरे पडलेले ते कागद कल्पनेचा रंगांनी रंगवले
तशीच ही एक आजची संध्याकाळ होती
खातात कडक असा चहा चा कप 
आणि आठवणीत या दिवसांची शिदोरी होती
घड्याळाचा काटा .. पळून पळून तोही दमला होता
नव्याने पुन्हा जवळ येणारी नाती पाहून तोही उमंगला होता.

Comments

Post a Comment

Popular Posts